छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातल्या एका दुर्गम गावात पहिला मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. टेकुलागुडेम गावात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीत हा टॉवर उभा केला आहे. या टॉवरमुळे या परिसरातल्या दुर्गम गावांना मोबाईल नेटवर्कची सुविधा मिळणार आहे. माओवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी सीआरपीएफने गेल्या वर्षी टेकुलागुडेम इथं छावणी टाकली होती.
Site Admin | March 16, 2025 2:55 PM | Chhattisgarh | Mobile Tower
छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात उभारला पहिला मोबाईल टॉवर !
