छत्तिसगडमधल्या दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांमधे मिळून आज ३१ माओवाद्यांनी शरणागती पत्करली. दंतेवाडा जिल्ह्यातून २६ माओवाद्यांनी शरणागती पत्करली, त्यातल्या तीन माओवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी साडेचार लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं.
नारायणपूर जिल्ह्यात पाच महिला माओवाद्यांनी शरणागती पत्करली असून या प्रत्येकीवर एक लाख रूपयांचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण केल्याबद्दल या माओवाद्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश प्रोत्साहन योजनेनुसार देण्यात आला आहे. त्याचबरोबर नक्षल पुनर्वसन धोरणानुसार त्यांना सगळ्या सोयीसुविधा पुरवल्या जातील.