छत्तीसगढमधे नक्षलग्रस्त भागात झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमधे ३० माओवादी ठार झाले, तर जिल्हा राखीव दलाचा एक जवान शहीद झाला.. बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमाभागात माओवादी लपून बसलेले असल्याची खबर मिळाल्यावरुन सुरक्षा दलांची संयुक्त पथकं शोधमोहीम राबवत होती. त्यावेळी गंगलूर भागात ही चकमक उडाली.
या चकमकीत २६ नक्षली अतिरेकी ठार झाले. त्यांचे मृतदेह मिळाले असून शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. या मोहिमेत सुरक्षा दलाचा एक जवानही शहीद झाला. कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमधे झालेल्या चकमकीत ४ माओवादी ठार झाले.