छत्तीसगढ च्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज सकाळी नक्षलवाद्यांनी पेरलेलं एक शक्तिशाली स्फोटक शोधून ते निकामी केलं. हे स्फोटक ४५ किलो वजनाचं असून एका मिनी ट्रक चा विध्वंस करून जमिनीत १५ फुटांचा खड्डा पडेल इतकं ते शक्तिशाली होतं . केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २२२व्या बटालियनने आज सकाळी एका कामगिरीवरून परत येताना हे स्फोटक शोधून काढलं .
Site Admin | March 28, 2025 1:22 PM | Chhattisgarh | nakshal
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेली स्फोटकं निकामी करण्यात यश
