डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 23, 2025 1:40 PM | Chhattisgarh

printer

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या अड्ड्यांवरुन शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा साठा जप्त

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी माओवाद्यांच्या अड्ड्यांवरुन शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा  साठा जप्त केला. या बाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी सुरक्षा दलाच्या मदतीनं मार्कनगुडा गावाजवळ  टेकडीवरच्या जंगलात लपवलेला शस्त्रसाठा हस्तगत केला. माओवाद्यांनी केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दल आणि कमांडोच्या तुकड्या या कारवाईत सहभागी झाल्या होत्या. गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या तुकड्यांवर  हल्ला करण्याच्या उद्देशानं हा साठा माओवाद्यांनी लपवून ठेवला होता, अशी माहिती  सूत्रांनी दिली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा