सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण-राजकोट इथं शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली. ओरोस इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजकोट इथं शिव छत्रपतींचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा उभारणार येणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. पुतळ्याच्या बाजूला असलेल्या आरक्षित जागेवर शिवसृष्टी उभारण्यात येणार असून या दोन्हीसाठी एकूण १०० कोटी खर्च प्रस्तावित असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. पुतळा सहा महिन्यात तर शिवसृष्टीच काम एका वर्षात पूर्ण होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं.