नुकत्याच संपन्न झालेल्या छठ पूजा महोत्सवासाठी बिहारमध्ये गेलेल्या प्रवाशांच्या परतीची सोय करण्यासाठी मध्य-पूर्व रेल्वे विभागानं रेल्वेच्या ४४६ फेऱ्यां सुरू केलं आहे. या फेऱ्यांच्या माध्यमातून बिहारमधल्या नागरिकांना इच्छित स्थळी पोचवलं जाणार आहे. या फेऱ्या आजपासून सुरू होणार असून आगामी १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण केल्या जाणार आहेत. या अतिरिक्त फेऱ्यांसाठी यंदा गेल्या वर्षीपेक्षा ७० अधिक गाड्यांची सोय करण्यात आली असल्याचं सूत्रांनी कळवलं आहे.
Site Admin | November 8, 2024 8:20 PM | Bihar | ChhathPuja2024 | Indian Railway
बिहारला गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी ४४६ विशेष रेल्वे गाड्या
