राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश नसल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये आंदोलनं करण्यात आली. कार्यकर्त्यांनी, भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवला तालुक्यात विंचुर इथं रास्ता रस्ता रोको केला, तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनासमोर घोषणाबाजी केली. काल रात्री काही कार्यकर्त्यांनी टायर जाळले होते.
दरम्यान, आपल्याला पक्षानं राज्यसभेवर जाण्याबाबत विचारणा केली होती. मात्र तसं करणं हा आपल्या मतदारसंघातल्या मतदारांचा विश्वासघात ठरेल, असं सांगून त्याला नकार दिल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असूनही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं नसल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.