डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 21, 2024 5:43 PM | Chhagan Bhujbal

printer

राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांचं कमिशन वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक – मंत्री छगन भुजबळ

राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांचं कमिशन वाढवण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितलं. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज रास्त भाव दुकानदारांची बैठख झाली, यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल उपस्थित होते. 

रास्त भाव दुकानारांना स्टेशनरी आणि भाजीपाला विकायला परवानगी देण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातल्या ५६ हजार दुकानदारांना झाला आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं. या दुकानदारांना क्विंटल मागे दीडशे रुपये कमिशन दिलं जातं. हे कमिशन अत्यल्प असल्याने त्यात वाढ करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. तसंच ई पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने ऑफलाईन वितरण करायला परवानगी देण्यात आली आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा