महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्यावतीनं फिडे महिला ग्रां प्री बुद्धिबळ स्पर्धेचा पाचवा टप्पा पुण्यात १३ ते २४ एप्रिल या कालावधीत रंगणार आहे. जगातल्या आघाडीच्या बुद्धिबळपटू यात सहभागी होतील. जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेती आणि ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदकपटकावणारी ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली, ग्रँडमास्टर आर. वैशाली, दिव्या देशमुख यांच्यासह चीन, रशिया, पोलंड, बल्गेरिया, मंगोलिया, जॉर्जिया या देशांच्या बुद्धिबळपटू या स्पर्धेच्या मैदानात असतील.
या मालिकेतल्या सर्वोत्तम दोन बुद्धिबळपटू कँडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरणार असून पुढच्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेसाठी चॅलेंजर निश्चित करण्यात ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.