डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ग्रामीण भागाचं चित्र बदललं तरच देश विकसित होईल – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

शेती हा ग्रामीण विकासाचा कणा असून जोपर्यंत ग्रामीण भागाचं चित्र बदलत नाही तोपर्यंत देश विकसित होऊ शकत नाही, असं प्रतिपादन उप राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. नवी दिल्ली इथं चौधरी चरणसिंह पुरस्कार  प्रदान सोहळ्यात ते आज बोलत होते. शेतकरी जेव्हा आत्मनिर्भर होईल तेव्हाच ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था उभी राहु शकते असं धनखड म्हणाले. यावेळी उपराष्ट्रपतींनी चौधरी चरणसिंह यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. तसंच शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास यासाठीच्या चरणसिंह यांच्या योगदानाचाही उल्लेख केला. 

 

भारत ही जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा