छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० माओवाद्यांनी आज आत्मसर्पण केलं. यात प्रत्येकी ६८ लाख रुपये इनाम असणाऱ्या १४ नक्षलींचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सैन्य आणि प्रशासनानं दुर्गम खेड्यात केलेल्या सुविधांमुळे प्रभावित होऊन या नक्षलींनी आत्मसर्पण केल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे. इतर नक्षलवाद्यांनाही हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन शहा यांनी समाज माध्यमावर केलं आहे.
दरम्यान, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट होऊन आज एका आदिवासी महिलेचा मृत्यू झाला.