डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षली ठार

छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षली ठार झाले. यामध्ये ११ महिलांचा  समावेश आहे.  केरलापार पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या जंगलात जिल्हा राखीव दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं काल रात्री नक्षली विरोधी  मोहीम राबवली होती. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले. ठार झालेल्यांपैकी एकाची ओळख पटली असून, त्याचं नाव जगदीश उर्फ बुधरा असं आहे. पोलिसांनी त्याच्यावर २५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. 

 

घटनास्थळावरून पोलिसांनी एके ४७, सेल्फ लोडिंग रायफल, रॉकेट लाँचर, ३०३ रायफल, बॅरल ग्रेनेड लाँचरसह मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारूगोळा जप्त केला आहे.

 

दरम्यान, छत्तीसगडमधल्या या नक्षली विरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे की, शस्त्र आणि हिंसाचारानं कोणताही बदल घडणार नसून, शांतता आणि विकासानंच ते साध्य होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा