जम्मू-काश्मीरमधल्या शिव खोरी, रानसू इथून यात्रेकरूंना कटरा इथं घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणातला आरोपी हकमखान याच्याविरुद्ध एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं काल आरोपपत्र दाखल केलं. गेल्या ९ जून रोजी हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात आठ यात्रेकरू तसेच बस चालक ठार झाला होता तर ४१ यात्रेकरू गंभीर जखमी झाले होते. गोळीबारामुळे बस चालकाच्या डोक्याला गोळी लागल्यानं त्याचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस एका खोल दरीत कोसळल्यानं अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
Site Admin | December 15, 2024 1:54 PM | Jammu and Kashmir | terrorist attack