बहुप्रतिक्षित चारधाम यात्रेचा आज उत्तराखंड इथे, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. रुद्रप्रयाग जिल्ह्यात उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात धामी यांनी यात्रेला सुरुवात झाल्याची घोषणा केली. चारधाम यात्रेकरूंना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. ही यात्रा सुरळितपणे तसंच सुरक्षितपणे व्हावी यासाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली असून त्यानुसार व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं धामी म्हणाले.