श्रम सुविधा आणि समाधान पोर्टल अधिक कार्यक्षम आणि प्रभावी करण्यासाठी त्यात तांत्रिक सुधारणा करण्यात आल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते काल पोर्टल आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
तांत्रिक सुधारणा मुळे या पोर्टलचा वापर अधिक सुलभ होणार असून त्याचा लाभ देशभरातील आस्थापनांना होणार आहे. याद्वारे कामगारांच्या हिताचं संरक्षण तसचं त्यांच्या कामातही सुधारणा व्हायला मदत होईल असंही ते म्हणाले.