देशी हरभऱ्याच्या आयातीवर १ एप्रिलपासून १० टक्के आयात शुल्क लावायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. अर्थमंत्रालयानं २७ मार्च रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे. हरभऱ्याची देशातली उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारनं हरभऱ्याच्या निःशुल्क आयातीला परवानगी दिली होती. याची कालमर्यादा येत्या ३१ मार्च रोजी संपणार आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार २०२४-२५मध्ये १ कोटी १५ लाख टन देशी हरभऱ्याचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे.
Site Admin | March 28, 2025 6:44 PM | chane | Finance Ministry
चण्याच्या आयातीवर १०% आयात शुल्क लागणार
