डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भाजपा-महायुतीमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही-चंद्रशेखर बावनकुळे

भाजपा-महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नसल्याचं महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज सकाळी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, उपमुख्यमंत्री अजित पवार परदेशात गेले होते, त्यामुळे पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाली नाही. या संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

बीड हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रकारची चौकशी सुरू केली असून आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होईल, असं ते म्हणाले. झुडपी जंगल जमिनीवरची घरं कायदेशीर करून देण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा