चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एनईएफटी आणि आरटीजीएस ऑनलाइन प्रणाली हॅक करून सायबर चोरट्यांनी ३ कोटी ७० लाख ६४ हजार ७४२ रुपये लंपास केले आहेत. बँक व्यवस्थापकांनी याची तक्रार पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडे केली आहे. पोलिसांनी यावर तातडीनं कारवाई करत ३३ खाती गोठविली असून यातून प्रत्यक्ष ६० लाख रुपये बँकेला परत आले आहेत तर अन्य बँकांमधील ७१ लाख होल्ड करण्यात आले असल्याने बँकेला आतापर्यंत १ कोटी ३२ लाख रुपये परत मिळवून देण्यात यश आले आहे. ही बँक एका शासकीय बँकेशी लिंकअप असून त्याद्वारे ऑनलाइन व्यवहार केले जातात. सर्व रक्कम हरियाणा इथं बँक खात्यावर वळती झाल्याचं तपासात समोर आलं आहे.
Site Admin | February 13, 2025 8:04 PM | chandrapur
Cyber Froud: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३,७०,६४,७४२ रुपये लंपास
