चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड इथल्या घोडाझरी तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी ही घटना घडली. हे तरुण चिमूर तालुक्यातल्या साटगाव कोलारी इथले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं सर्व युवकांचे मृतदेह बाहेर काढले असून यातले चार जण एकाच कुटुंबातली भावंडं आहेत.
Site Admin | March 15, 2025 9:07 PM | chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यात तलावात बुडून पाच युवकांचा मृत्यू
