पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरु डॉ. अजित रानडे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं डॉ. रानडे यांनी कुलपती संजीव सन्याल यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मात्र या पदासाठी आपल्या अर्हतेत उणीव होती असा या राजीनाम्याचा अर्थ नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. डॉ. रानडे यांच्या कुलगुरुपदी नियुक्तीवरुन अलिकडेच मोठा वाद झाला होता, त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी पदभार पुन्हा स्वीकारला होता.