येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून यादरम्यान किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहिल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
याकाळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, त्यापैकी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडयात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही विभागानं नमूद केली आहे.