येत्या 24 तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
सांगली जिल्ह्यात तसंच रत्नागिरीमध्येही काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे शहराच्या काही भागातही काल रात्री पावसाच्या जोरदार सरी आल्या. बुलडाणा जिल्ह्याला नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक गावांत पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Site Admin | October 15, 2024 10:32 AM | Rain | State
राज्यात येत्या 24 तासात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता
