पंजाब, हरयाणा, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात रात्रीच्या वेळी दाट धुकं पडेल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे इथं उद्यापर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
मच्छिमारांनी कन्याकुमारी लगतच्या समुद्र किनारपट्टी लगतचा परिसर तसंच त्यालाच लागून असलेल्या गल्फ ऑफ मुन्नार क्षेत्रात जाऊ नये असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. मच्छिमारांना उद्यापर्यंत कोमोरिन परिसर आणि लगतच्या मन्नारच्या आखातात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
येत्या आठवड्यात पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थानचा उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात रिमझीम पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.