डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ जाहीर

येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी बीसीसीआयनं १५ सदस्यीय संघाची आज घोषणा केली. रोहित शर्मा या संघाचा कर्णधार असेल, तर तर शुभमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. या दोघांशिवाय विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचा संघात समावेश आहे.

 

या स्पर्धेआधी इंग्लंड विरोधात तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिकाही भारतीय संघ खेळणार आहे. या मालिकेसाठीही हाच संघ असेल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह उपलब्ध नसल्यानं, त्याच्याऐवजी हर्षित राणाचा संघात समावेश केला आहे.

 

दरम्यान, रणजी करंडक स्पर्धेत येत्या २३ जानेवारीपासून मुंबईत होणार असलेल्या मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर सामन्यात खेळणार असल्याचं रोहित शर्मा यानं जाहीर केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा