भारताने ए डी पी सी अर्थात आशियाई आपत्ती सुसज्जता केंद्राचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे. ‘ए डी पी सी’ ही आशियाई आणि पॅसिफिक क्षेत्रात आपत्ती निवारण आणि पर्यावरण लवचिकता याबाबत सहकार्य आणि अंमलबजावणी करणारी स्वायत्त आंतरराष्ट्रीय संघटना असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.
भारतासह बांग्लादेश, कंबोडिया, चीन, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपाईन्स, श्रीलंका आणि थायलंड हे शेजारी देश ए डी पी सी चे संस्थापक सदस्य देश आहेत. जागतिक तसंच प्रादेशिक स्तरावर आपत्ती जोखीम नियंत्रण राखण्यात भारताची भूमिका महत्वाची राहिल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.