छत्तीसगडमध्ये आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले असून यात दोन महिला बंडखोरांचा समावेश आहे. बिजापूर जिल्हयातल्या राष्ट्रीय उद्यानात माओवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यावर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनं या भागात शोध मोहिम राबवली. या अभियानात मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला असून यात एक स्वयंचलित रायफल आणि बी जी एल लाँचरचा समावेश आहे. या विभागात शोध अभियान अजुनही सुरु आहे.
Site Admin | January 12, 2025 8:19 PM | Chattisgarh
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार
