प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज मुंबईत दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व विभागांची माहिती जाणून घेतली आणि अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी विभागप्रमुखांना सूचना दिल्या. मे महिन्यात १ ते ४ तारखेदरम्यान होणाऱ्या waves परिषदेच्या तयारीचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.