टेलिग्राम एपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॉवेल दुरोव्ह यांची जामीनावर सुटका झाली आहे. पॅरिसचे सरकारी वकील लॉर बेको यांनी सांगितलं की दुरोव्ह यांना पन्नास लाख युरो भरल्यावर जामीन मिळाला असून चौकशी पूर्ण होईपर्यंत फ्रान्समधून बाहेर जायला मनाई करण्यात आली आहे. टेलिग्राम माध्यमावर खंडणी, धाकदपटशा, विकृत मजकूर प्रसिद्ध करणे, दहशतवादाचं उदात्तीकरण करणे, अशा प्रकरचे गुन्हे करणाऱ्यांना अटकाव केला नसल्याचा आरोप दुरोव्ह यांच्यावर आहे. गेल्या शनिवारी फ्रेंच पोलिसांनी दुरोव्ह यांना पॅरिस विमानतळावर अटक केली. दरम्यान, समाजमाध्यम चालवताना आपण युरोपीय संघाच्या कायद्याचं पालन करीत असल्याचं टेलिग्राम कंपनीनं म्हटलं आहे.
Site Admin | August 29, 2024 1:52 PM | Telegram