प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होत असलेल्या महाकुंभ मेळ्यासंबंधित विविध कार्यक्रमांबाबत काल प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रयागराज इथल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या बैठकीत आकाशवाणीचे संचालक प्रज्ञा पालीवाल, दूरदर्शनचे महासंचालक कंचन प्रसाद, दूरदर्शन वृत्त चे महासंचालक कंचन प्रिया कुमार उपस्थित होते. यावेळी महाकुंभाच्या जागतिक प्रसारण आणि इतर कार्यक्रमांविषयी चर्चा झाली. हे सर्व अधिकारी आज कुंभमेळा परिसराची पाहणी करणार आहेत.
Site Admin | December 5, 2024 2:23 PM | गौरव द्विवेदी | प्रयागराज | प्रसार भारती | महाकुंभ मेळा
प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रयागराज इथल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर केली चर्चा
