देशातल्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना विशेष तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागांना वायू प्रदूषणाच्या तयारीबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्रात वायू प्रदूषणाचा श्वसनक्रिया, हृदय तसंच रक्तवाहिन्यांसंबंधीच्या यंत्रणांना प्रभावित करणाऱ्या आजारांशी थेट संबंध असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. लहान मुलं, गरोदर महिला आणि वृद्धांवर याचा अधिक परिणाम होत असल्याने राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी जनजागृती करण्याचे निर्देश या पत्रातून दिले आहेत.
Site Admin | October 25, 2024 7:53 PM | AirPollution