विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचं लक्ष्य असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. गेल्या दहा वर्षांत महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंगभाव समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं त्या म्हणाल्या. दिल्ली इथं त्यांच्या उपस्थितीत आजपासून देशभरात बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात झाली. बालविवाहासारख्या प्रथेचं देशातून समूळ उच्चाटन करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली. जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत माहिती मिळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे.
Site Admin | November 27, 2024 1:33 PM | Bal Vivah Mukt Bharat