कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृतीवेतन मंत्रालयाने सार्वजनिक तक्रारींची ठराविक कालावधीत दखल घेण्यासाठी नियमावली तयार केली आहे. नागरिकांना त्यांच्या तक्रारी www.pgportal.gov या पोर्टलवर नोंदवता येतील. या तक्रारींची दखल घेण्यासाठी केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना नोडल अधिकारी नियुक्त करावे लागतील. या तक्रारींची तड लागल्यानंतर तक्रारदारांना SMS तसंच ईमेल च्या माध्यमातून तसं कळवलं जाईल, असं मंत्रालयानं कळवलं आहे.
Site Admin | August 26, 2024 8:54 PM