केंद्र सरकारनं खलिस्तानी समर्थक असेलल्या ‘सिख्स फॉर जस्टिस’ या संघटनेवरची बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत काल ही कारवाई करण्यात आली. भारतानं दहशतवादी म्हणून घोषित केलेला गुरपतवंत सिंग पन्नून अमेरिकेतून चालवत असलेली ही संघटना देशविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचं आढळून आल्यानं केंद्र सरकारनं 2019 मध्ये या संघटनेवर बंदी घातली होती. तर राष्ट्रीय तपास संस्थेनंही पन्नूनवर याधीच अनेक खटले दाखल केले आहेत.
Site Admin | July 10, 2024 10:36 AM