खलिस्तान समर्थक असलेल्या सिख फॉर जस्टिस या संघटनेवरील बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. बेकायदा कारवाई प्रतिबंध कलमाअंतर्गंत हा निर्णय घेतला आहे.संघटनेच्या कारवायांमुळे देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षिततेला धोका असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या संघटनेविरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत.
सिख फॉर जस्टिस अमेरिकेमधील संघटना असून गुरपतवंत सिंह पन्नून हा त्याचा प्रमुख आहे. पन्नून याला भारतानं दहशतवादी म्हणून जाहीर केलं आहे.