डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 13, 2024 8:04 PM

printer

कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे निर्देश

कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार आणि  हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयानं आज दिले. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र तात्काळ सीबीआय कडे सोपवावीत असे निर्देश न्यायालयानं दिले. तसंच राज्यसरकारला  आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. न्यायालयानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अनिश्चित काळासाठी रजेवर जाण्याचा आदेश दिला. घोष यांचा जवाब नोंदवण्यामध्ये  झालेल्या विलंबाबद्दल प्रश्न उपस्थित करत, आंदोलनकर्त्या डॉक्टरांची समस्या दूर करण्यासाठी राज्यसरकार काय उपाय करत आहे, अशी विचारणा केली.  

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे आपला बेमुदत संप चालूच ठेवण्याचा निर्णय ‘फोरडा’ या निवासी डॉक्टर संघटनेनं घेतला आहे. कोलकाता इथल्या या घटनेच्या निषेधार्थ, देशभरातल्या सरकारी रुग्णालयांमधल्या निवासी डॉक्टरांनी कालपासून बेमुदत संप पुकारला आहे. पश्चिम बंगालचे आरोग्य सचिव नारायण स्वरुप निगम यांनी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.    

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज भारतीय वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा