मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मिना यांच्या हस्ते काल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कल्याण स्थानकात, सिग्नल आणि दूरसंचार विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेल्या साक्षी गुप्ता यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारार्थिंनी, आपल्या कर्तव्याप्रती दाखवलेलं समर्पण आणि दक्षता प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे, असं मिना या प्रसंगी बोलताना म्हणाले.