सक्षम संरक्षण औद्योगिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार आत्मनिर्भरता आणि तांत्रिक सहकार्यावर भर देत परिवर्तनकारी धोरणात्मक सुधारणा करत आहे,असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत विविध देशांच्या राजदूतांच्या गोलमेज परिषदेत बोलत होते.
पुढील महिन्यात बेंगळुरू इथं होणाऱ्या ‘एरो इंडिया २०२५’ या आशियातील सर्वात भव्य हवाई प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काल या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राजनाथ सिंह यांनी संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील देशाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला.