डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 20, 2024 12:23 PM | Ashwini Vaishnav

printer

सरकारी तंत्रशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न-अश्विनी वैष्णव

केंद्र सरकार विविध उपक्रमांद्वारे शासकीय तंत्रशिक्षण क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. वैष्णव यांनी काल मुंबईत महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली, या बैठकीदरम्यान ते बोलत होते. या क्षेत्रातील नवनवीन कल्पनांचे प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन त्यांनी सरकारी तांत्रिक अभियांत्रिकी संस्थांना यावेळी केलं. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आणि आय आय टी थ्रीडी पेंटिंगबाबत सादरीकरण करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा