ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिल्याचं राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज बातमीदारांना सांगितलं. विखे पाटील यांनी या संदर्भात अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. याबात प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना शाह यांनी केल्याचंही विखे पाटील यांनी सांगितलं.
Site Admin | July 4, 2024 7:53 PM
दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा
