केंद्र सरकारच्या सहकार से समृद्धी या योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून ५०० ते १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम उभारले जाणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय, नाबार्ड तसचं राज्य सहकार मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम असून तो राज्यातल्य प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाईल. त्यातल्या नाशिक जिल्ह्यात सात विविध कार्यकारी सोसायट्यांशी आज करार झाला.