केंद्रसरकार, शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित करून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल दिलं. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना चौहान बोलत होते. शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा यासाठी केंद्रसरकार कटिबद्ध असल्याचं सांगून, अर्थसंकल्पातही कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदीत, 2013-14 च्या तुलनेत आता 1 लाख 22 हजार 528 कोटी रुपयांची अभूतपूर्व वाढ केल्याचं त्यांनी नमूद केलं.
Site Admin | December 7, 2024 11:15 AM | central government | farmers | Union Agriculture Minister