गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी तसंच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातले घाऊक, किरकोळ व्यापारी, साखळी पुरवठादार आणि प्रक्रिया उद्योग यांना ही साठवणूक मर्यादा लागू असेल.
अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. गव्हाच्या साठ्याची कमाल मर्यादा घाऊक व्यापाऱ्यांसाठी 3 हजार टन, किरकोळ विक्रेत्यांसाठी 10 टन तर साखळी पुरवठादारांसाठी सर्व गोदामांमध्ये मिळून 3 हजार टन इतकी असेल. देशात गव्हाची उपलब्धता कमी असल्याचा वृत्ताचा चोप्रा यांनी इन्कार केला.