केंद्र सरकारने येत्या १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला पंचायती राज संस्थांच्या निवडून आलेल्या चारशे प्रतिनिधींना विशेष पाहुणे म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित केलं आहे. त्यात महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. पंचायती राज मंत्रालयानं उद्या नवी दिल्लीत पंचायतींमधल्या महिला नेतृत्वाविषयीच्या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. पंचायतींमधल्या महिला लोकप्रतिनिधींसमोरची आव्हानं आणि स्थानिक प्रशासनात महिलांचा सहभाग वाढवणे या धोरणांवर कार्यशाळेत चर्चा होणार आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव सिंह आणि पंचायत राज राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल हे उद्या त्यांचा सत्कार करणार आहेत. या कार्यशाळेतच ई-ग्रामस्वराज हे बहुभाषिक व्यासपीठ सुरू केलं जाणार आहे.
Site Admin | August 13, 2024 8:10 PM | Independence Day | Panchayati Raj Representatives