सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या दोन राखीव बटालियनच्या निर्मितीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सीआयएसएफच्या बटालियनची संख्या १५ होणार आहे. या बटालियनमध्ये एक हजार २५ सैनिक असतील तसंच याचं नेतृत्व वरिष्ठ कमांडंट स्तराचा अधिकारी करेल. नव्या बटालियनमध्ये अति सुरक्षित कारागृहाची व्यवस्था हाताळण्याचा अनुभव असणारे सैनिक असतील.