डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 30, 2024 8:50 AM | Central Govt.

printer

पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून ३ हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी

देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक मदतीवर पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंग्रहालय तसंच कृत्रिम प्रवाळ निर्मिती प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपये, तर नाशिक इथं रामकाल मार्गासाठी ९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पर्यटनामध्ये अनेकांच्या जीवनात समृद्धी आणण्याची क्षमता असून, सरकार देशात पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा