केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणानं साडेसात CEAगिगावॅट क्षमतेच्या सहा हायड्रो पंप स्टोरेज प्रकल्पांना आज मंजुरी दिली आहे. यात महाराष्ट्रातल्या भिवपुरी इथं एक हजार मेगावॅट तर भावली इथंल्या दीड हजार मेगावॅट क्षमतेच्या हायड्रो प्रकल्पांचा समावेश आहे. दीर्घकालीन ऊर्जा साठवणुकीसाठी आखलेल्या उपायांमधील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणानं मंजुरी दिलेल्यात ओदिशातल्या अप्पर इंद्रावती इथं ६०० मेगावॅट क्षमतेचा, कर्नाटकमधील शरावती दोन हजार मेगावॅट, मध्य प्रदेशातल्या एमपी ३० इथं १ हजार ९२० मेगावॅट आणि आंध्र प्रदेशातल्या चित्रावती इथं ५०० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचा समावेश आहे.