डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 11, 2025 8:37 PM | ECI | ECISVEEP

printer

केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांकडून मागवल्या सूचना

देशातली निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत. मतदार याद्यांमधे घोळ असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा पुढाकार घेतला आहे. निवडणूक प्रक्रीयेत काही अडचणी असल्यास येत्या ३० एप्रिलपर्यंत कळवाव्या असं पत्र मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सर्व राजकीय पक्षांना लिहीलं आहे. सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी यांनी वेळोवेळी राजकीय पक्षांच्या बैठका घेऊन त्यांच्या अडचणी दूर कराव्या, असं आयोगाने गेल्या आठवड्यातच सांगितलं होतं. मतदारांना एकापेक्षा अधिक नोंदणी क्रमांक मिळाल्याबाबत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा