तेलंगणा राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सहा सदस्यीय केंद्रीय समिती लवकरच पाहणी करणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव कर्नल कीर्ती प्रताप सिंग हे या समितीचं नेतृत्व करतील. समितीनं आज सकाळी हैदराबाद इथल्या सचिवालयातल्या जेष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी आणि तेलंगणा राज्याच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांच्याशी चर्चा केली. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा उशिरा मिळूनदेखील प्रशासनानं जय्यत तयारी ठेवली होती आणि प्रशासनानं केलेली शीघ्र कृतीमुळे फारशी मनुष्यहानी झाली नाही,असं मुख्य सचिवांनी सांगितलं. या नैसर्गिक आपदेत ५ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं आणि सुमारे ३० नागरिक दगावले.
Site Admin | September 11, 2024 8:26 PM | Telangana