डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मतदारांना निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिकसहभागी होण्याचं निवडणूक आयोगाचं आवाहन

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनाही सहभागी व्हावं आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी असं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मुंबईत केलं. त्यासाठी विविध शहरांमध्ये विशेष मोहिम राबवली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईत वार्ताहर परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली. मतदान केंद्रावर मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यात याव्या असे आदेश दिले आहेत. त्यासाठी एका मतदान केंद्रावर सरासरी ९५० मतदार असतील याची काळजी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या यंदा १ लाखांहून अधिक मतदान केंद्र असतील. शहरी भागातल्या जवळपास १०० टक्के आणि ग्रामीण भागातल्या ५० टक्के मतदान केंद्रावर web casting सुविधा दिली जाणार आहे. यावेळी १ हजार १८१ मतदान केंद्र ही उंच इमारतीमध्ये आणि २१० झोपडपट्टी मध्ये असणार आहेत. आजूबाजूच्या राज्यातून अवैधरीत्या होणारी रोख रक्कम, अंमली पदार्थ, मद्य आणि इतर वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी ३२२ चेक पोस्ट निर्माण करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. 

निवडणूक आयोगानं या दौऱ्यात राज्यातल्या ११ पक्षांशी चर्चा केली. दिवाळी, देव दिवाळी आणि इतर सण ध्यानात घेऊन निवडणुकांची तारीख निश्चित करावी. सुटीच्या दिवसाला लागून मतदानाचा दिवस येणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी या पक्षांनी केल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले. 

३ वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी असलेल्या किंवा गृह जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करावी आणि त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवण्याच्या स्पष्ट सूचना मुख्य सचिवांना दिल्याचंही ते म्हणाले. निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभनं दाखवली जाऊ नये यासाठी विशेष लक्ष दिलं जाणार आहे. एटीएममध्ये पैसे भरणारी वाहनं सूर्यास्तानंतर काम करणार नाहीत. तसंच ऑनलाइन पैसे हस्तांतरणात अचानक काही वेगळ्या घडामोडी दिसून आल्या तर तत्काळ कळवण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

जनतेनं उत्साहानं या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं निवडणूक आयुक्तांचं आवाहन

सर्वाधिक वाचले

सर्व पहा